24 November 2020

News Flash

शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं आईनं मुलीला पेन्सिलनं भोसकलं; मुंबईतील हादरवून टाकणारी घटना

धक्कादायक घटना; सहावीत शिकणारी मुलगी गंभीर जखमी

प्रातिनिधीक छायाचित्र

ऑनलाईन वर्ग सुरू असताना शिक्षकानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही म्हणून आईनं सहावीत शिकणाऱ्या मुलीवर पेन्सिलनं वार केले. चिडलेल्या आईनं मुलीच्या पाठीत पेन्सिल भोसकलं. त्याचबरोबर अनेकदा पेन्सिलनं वार करत मुलीला जखमी केलं. मुंबईत ही घटना घडली असून, पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

करोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्यानं, त्याचबरोबर प्रसार होण्याच्या भीतीमुळे सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहेत. यामुळे मुलांची चिडचिड होत असल्याचं समोर येत असतानाच मुंबईत हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

सहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीवर आईनं रागाच्या भरात पेन्सिलनं हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी ही घटना घडली. ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलीला शिक्षकाने प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मुलीला देता आलं नाही. त्यामुळे तिच्या आईला याचा राग आला. संतापाच्या भरात आईनं मुलीच्या पाठीत पेन्सिल भोसकलं. त्यानंतर पेन्सिलनंच अनेक वार केले. हा सगळा प्रकार जखमी मुलीच्या मोठ्या बहिणीनं बघितला. त्यानंतर तिने चाईल्ड हेल्पलाईनला फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच स्वयंसेवी संस्थेचे दोन कार्यकर्ते मुलीच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर महिलेनं काहीच उत्तर दिलं नाही. सदरील महिलेवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

शासनाने ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशी मोहीम राबवली असली तरी आता प्रत्यक्षात घरोघरी ‘शाळा बंद, समस्या सुरू’ अशी परिस्थिती दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून घरी अडकलेल्या मुलांना मिळणारे उपक्रम, शिक्षण, शिबिरे यांचे ऑनलाइन पर्याय अपुरे ठरू लागले आहेत. लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, भीती या समस्या ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे निरीक्षण समुपदेशक, बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 10:59 am

Web Title: mumbai woman stabs daughter with pencil bmh 90
Next Stories
1 मुखपट्टी नसल्यामुळे गिरीश महाजन यांना दंड
2 रुग्णालयाच्या शौचालयात १४ दिवस करोना रुग्णाचा मृतदेह होता पडून; मुंबईतील धक्कादायक घटना
3 मुंबई सेंट्रलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
Just Now!
X