News Flash

उरणमधील नदीपात्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू

सुटीसाठी उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या परिसरातील एका फार्म हाऊसवर उतरलेले तरुण शेजारील नदीपात्रात गेलेले असताना त्यांच्यापैकी ऋषभ राजेश कारल (१७) हा तरुण बेपत्ता झाल्याचे त्याच्या

| September 6, 2014 04:39 am

सुटीसाठी उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या परिसरातील एका फार्म हाऊसवर उतरलेले तरुण शेजारील नदीपात्रात गेलेले असताना त्यांच्यापैकी ऋषभ राजेश कारल (१७) हा तरुण बेपत्ता झाल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो बुडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋषभ हा मुंबईतील चेंबूर परिसरात राहणारा आहे.
रानसई धरणातील अधिकचे पाणी पोई विंधणे या नदीपात्रातून वाहून जात असल्याने या पात्रात पोहण्यासाठी हे तरुण आलेले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत असलेला ऋषभ दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्याचे चप्पल आढळून आल्यानंतर तो बुडाला असल्याचा संशय आल्याने स्थानिकांच्या मदतीने त्याच्या शोधाचे प्रयत्न करण्यात आल़े त्या वेळी त्याचा मृतदेह आढळला. सुटीसाठी आलेल्या तरुणाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात दु:ख व्यक्त केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 4:39 am

Web Title: mumbai youth drown in uran river
Next Stories
1 दुचाकी अपघातात चार तरुण ठार
2 कणकवलीतील अपघातात जोगेश्वरीतील तिघांचा मृत्यू
3 बोरिवलीत महिलेची हत्या करून चोरी
Just Now!
X