X
X

मुंबईतील तरुणाई डिजिटल

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात या मुलांच्या सवयीही खऱ्या अर्थाने ‘डिजिटल’ झाल्या आहेत.

‘जनरेशन झेड’ म्हणजेच हल्लीची वय वष्रे १२ ते १८ या वयोगटांतील मुले. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात या मुलांच्या सवयीही खऱ्या अर्थाने ‘डिजिटल’ झाल्या आहेत. ‘टाटा कन्सल्टंसी सर्विसेस’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने या १९९५ नंतर जन्माला आलेल्या या मुलांच्या डिजिटल सवयींची पाहणी करणारा ‘टीसीएस यूथ सव्र्हे’ हा सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. ‘टीसीएस विझ-क्विझ’अंतर्गत या कंपनीने देशभरातील १५ प्रमुख शहरांमध्ये तरुणांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मुंबईतील युवकांच्या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात काही मजेशीर निरीक्षणे आढळून आली आहेत.

‘स्मार्ट फोन’मय पिढी

मुंबईतील ८७ टक्के तरुणाईला सध्या हवेसे वाटणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे स्मार्ट फोन. यातील लक्षणीय बाब अशी की, इंटरनेट वापरासाठी ५२ टक्के तरुणाई ही स्मार्ट फोनलाच प्राधान्य देते. त्यापाठोपाठ संगणक आणि लॅपटॉपचा क्रमांक लागत असून ३६ टक्के तरुण या स्मार्ट फोनपेक्षा या साधनांचा वापर करताना आढळतात.

फेसबुक सर्वाधिक लोकप्रिय

मुंबईतील ७७ टक्के तरुणाईसाठी फेसबुक हे सगळ्यात लोकप्रिय समाजमाध्यम आहे. त्यापाठोपाठ ६२ टक्के तरुणाईने गूगल+ आपली पसंती दर्शवली आहे. यातील मजेशीर बाब म्हणजे इंटरनेटवर समाज माध्यमांच्या वापराच्या बाबतीत मुले ही मुलींपेक्षा सर्वाधिक वेळ घालवतात.

ट्विटरवर क्रीडापटू ‘हिरो’

ट्विटर हे मुंबईत ४२ टक्के मुले तर २२ टक्के मुलींमध्ये लोकप्रिय असून यातही मुले आघाडीवर दिसतात. तसेच ट्विटरवर यातील ५७ टक्के तरुणाई क्रीडा क्षेत्रातील बडय़ा खेळाडूंना ‘फॉलो’ करतात. त्याखालोखाल फिल्मी ताऱ्यांचा लागत असून ४२ टक्के तरुण अभिनेते-अभिनेत्रींना ‘फॉलो’ करतात.

व्हॉट्सअपला प्राधान्य

तात्काळ संदेश पाठविण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’ला सगळ्यात जास्त म्हणजे ८० टक्के तरुणांची पसंती आहे. त्या पाठोपाठ एसएमएमचा क्रमांक लागतो. पण त्याला पसंती अवघे ६ टक्के तरुणच पसंती देतात.

ऑनलाइन तरुणांवर पालकांचे लक्ष

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपकी १४ टक्के तरुण दिवसभरात किमान १ तास ऑनलाइन असतात. ३१ टक्के ‘नोटिफिकेशन’ला दिवसातून एकदा प्रतिसाद देतात. तर २१ टक्के हा प्रतिसाद ५ मिनिटांत देतात. यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे ऑनलाइन राहणाऱ्या तरुणाईतील ४५ टक्के जणांवर त्यांच्या पालकांचे लक्ष असते. तर ५१ टक्के जणांचे पालक त्यांच्या ऑनलाइन अकाऊंट्सवर स्वत: जाऊ शकतात.

ऑनलाइन शिका

मुंबईतील जनरेशन झेडमध्ये लक्षात येणारी वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे नेहमीच्या शिक्षणपद्धतीपासून हटके कुठेही, कधीही शिकण्याकडे वाढत चाललेला ओढा. ऑनलाइन शिक्षणपद्धतीकडे ही तरुणाई मोठय़ा संख्येने वळू लागली आहे. २२ टक्के तरुणाई एखादा नवा छंद शिकण्यासाठी व्हिडीओ चॅट करताना दिसते तर अभ्यासाचे प्रकल्प करण्यासाठी २१ टक्के तरुण ऑनलाइन असतात.

ऑनलाइन खरेदीला पसंती

ऑनालाइन खरेदी ही ८५ टक्के तरुणाईची प्राथमिकता असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. यामध्ये ५९ टक्के खरेदी ही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होते. त्यापाठोपाठ ५५ टक्के जण पुस्तके आणि सिनेमा तिकीटे खरेदीस प्राधान्य देतात तर ४३ टक्के जण प्रदर्शनांची तिकीट खरेदी करतात.

पारंपरिक प्रसारमाध्यमे महत्त्वाचीच

जगाबरोबर राहण्यासाठी व बातम्या मिळवण्यासाठी आजची ७७ टक्के तरुणाई टीव्ही आणि वृत्तपत्रे यांचाच सहारा घेते, असे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्याखालोखाल ४५ टक्के युवक ऑनलाइन स्रोतांचा वापर करतात. तर मित्र वा नातेवाईकांनी पाठवलेल्या फेसबुकवरील लिंक्सचा वापर बातम्यांसाठी करणाऱ्यांची संख्या ३१ टक्के आहे.

मुंबईतील जनरेशन झेड सामाजिकदृष्टय़ा सहकार्य करणारी, तंत्रज्ञानाची उत्तम जाण असणारी आणि खऱ्या अर्थाने डिजिटल नागरिक असणारी तरुणाई आहे. असे निरीक्षण ग्लोबल कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख व टीसीएसचे उपाध्यक्ष प्रदीप्ता बागची यांनी या निमित्ताने नोंदविले आहे.

20

  • Tags: digital,
  • Just Now!
    X