News Flash

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात, कोणीही जखमी नाही

अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान

अपघातात आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रविवारी वांद्रे येथील कलानगर जंक्शनजवळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातात सर्वजण सुखरुप असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

रविवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीतून कलानगर जंक्शन येथून जात होते. या दरम्यान विरुद्ध दिशेने येणा-या वाहन चालकाने सिग्नल तोडून आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. अपघातात आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या बोनेटचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर धडक देणा-या गाडीच्या दरवाजाचे नुकसान झाले. पोलिसांनी सिग्नल तोडून गाडी पुढे नेणा-या वाहनचालकावर कारवाई केली आहे. अपघातामध्ये आदित्य ठाकरे यांची चूक नसून वाहतुकीचे नियम मोडून गाडी चालवणा-या चालकावर कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातात सर्व जण सुखरुप असून तुमचे आशिर्वाद आणि पाठिंब्यामुळे आम्ही सुखरुप आहोत असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडक देणा-या वाहनचालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2017 4:44 pm

Web Title: mumbai yuva sena chief aditya thackerays bmw car met with an accident
Next Stories
1 मुंबई विमानतळावरील मुख्य रन वे फेब्रुवारीपासून दररोज ८ तास बंद
2 मॅरेथॉनला २३ लाख रुपयांच्या पे ऑर्डरवर परवानगी
3 नवउद्यमींसाठी नोव्हेंबर महिना चलनतापाचा!
Just Now!
X