सुमारे शंभर वर्षांपूर्वी उच्च दर्जाच्या टाइल्स आयात व्हायच्या. परंतु स्वदेशीच्या आग्रहापोटी भारत फ्लोअरिंग अँड टाइल्सच्या रुस्तम सिधवा यांनी भारतात अशा टाइल्सचं उत्पादन सुरू केलं. विशेष म्हणजे तत्कालिन जुन्या इमारतींमध्ये जशा टाइल्स बसवल्या गेल्या तशाच टाइल्सचं उत्पादन ही भारत फ्लोअरिंग आजही करते. त्यामुळे हेरिटेज वास्तुंसाठी “जशा होत्या तशा” टाइल्स उपलब्ध होणं आजही शक्य झालंय. इरॉस, लिबर्टी, रीगलसारख्या जुन्या सिनेमागृहांमध्ये तुम्हाला या टाइल्स बघायला मिळतील. हेरिटेज वास्तू जतन करण्यात भारत फ्लोअरिंगचा असलेला महत्त्वाचा सहभाग सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ आणि ‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिज तुम्हाला कशी वाटली हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…