ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या इंपीरियल बँकेचं स्वातंत्र्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असं नामकरण करण्यात आलं. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन बाजुला वेगवेगळी असलेली स्थापत्यशैली. व्हिक्टोरिया राणीच्या काळातली दिडशे वर्षांपूर्वीची व्हिक्टोरियन शैली आणि पन्नास वर्षांनंतर तिच्या पुत्राच्या एडवर्डच्या काळातली एडवर्डियन शैली अशा दोन प्रकारच्या स्थापत्यशैलींचा इथं संगम झालेला आहे. आई व मुलगा अशा दोघांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थापत्यशैलींचा संगम असलेल्या फोर्टमधल्या स्टेट बँकेच्या इमारतीची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…