सीताहरणानंतर प्रभू रामचंद्र या परीसरातील गौतम ऋषींच्या आश्रमात आल्याची कथा सांगितली जाते. त्यांना इच्छापूर्तीसाठी स्फटिकाच्या लिंगाची स्थापना करून पूजा करण्याचा उपदेश होतो. लक्ष्मण काशीवरून हे लिंग आणणार होते, परंतु त्यास वेळ लागतो म्हणून वाळूपासून लिंग बनवण्यात येतं, आणि त्यास वालुकेश्वर व आताचं वाळकेश्वर असं नाव पडतं. असं सांगितलं जातं की शिलाहार राजवटीत हे मंदिर काळ्या पाषाणात आत्ता राजभवन आहे तिथं होतं, परंतु पोर्तुगिजांनी तोफांचा मारा करून ते पाडलं. वाळकेश्वरचा हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या विशेष मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.