19 November 2019

News Flash

सतरंगी रे..! मुंबईच्या आकाशात दिसले इंद्रधनुष्य, पाहा नेटकऱ्यांनी शेअर केले २० भन्नाट फोटो

अनेकांना दोन दोन इंद्रधनुष्य एकाच वेळी दिसली

इंद्रधनुष्य (फोटो सौजन्य: अंतरा घोष, ट्विटर अकाऊण्ट)

मुंबई उपनगरांसहीत ठाणे परिसरामध्ये मागील दोन दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई परिसरामध्ये दोन दिवसांपासून ढगांच्या कडकडाटासहीत पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी तास दोन तास जोरदार पाऊस पडत असला तरी सकाळच्या सुमारात पाऊस विश्रांती घेत असल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र यामुळेच दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील नागरिकांना इंद्रधनुष्याचे दर्शन होत आहे. अनेकांनी यासंदर्भात ट्विटवरुन फोटो पोस्ट करत इंद्रधनुष्य पाहून दिवसाची सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. इंद्रधुनष्याचे हे फोटो शेअर करण्याचे प्रमाण इतके होते की भारतामध्ये ट्विटवरील टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये #Rainbow हा शब्द सातव्या क्रमांकावर ट्रेण्ड होत होता. पाहुयात मुंबईकरांनी ट्विटवरुन शेअर केलेले इंद्रधुनष्याचे भन्नाट फोटो…

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

दरम्यान, वायू वादळामुळे मुंबई आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे.

First Published on June 12, 2019 10:49 am

Web Title: mumbaikar went crazy after first rainbow of monsoon in mumbai sky scsg 91
Just Now!
X