09 August 2020

News Flash

मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात

पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मुंबई : पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत मुंबईतील पाणीपुरवठय़ात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा पालिकेने केली होती. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी मुंबईत दाखल होणार असल्याने ही पाणीकपात पुढे ढकलण्यात आली. आता पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्तीचे काम ७ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असून ते १३ डिसेंबर रोजी पूर्ण होईल. त्यामुळे ७ ते १३ डिसेंबर दरम्यान मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:45 am

Web Title: mumbaikars face 10 percent water cut in mumbai from december 7 to 13
Next Stories
1 मुंबई, ठाण्यात आज प्राथमिक फेरी
2 दोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत
3 मुंबईत वनहानी, चंद्रपुरात भरपाई!
Just Now!
X