20 November 2019

News Flash

मुंबईचे डबेवाले आज आणि उद्या सुट्टीवर

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी डबेवाले पंढरपूरला जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला संघटना

मुंबईतील चाकरमान्यांना घरगुती जेवणाचे डबे पुरवणारे मुंबईतील डबेवाले आज आणि उद्या (१२ आणि १३ जुलै) सुट्टीवर जाणार आहेत. या काळात ते ग्राहकांना जेवणाचा पुरवठा करु शकणार नाहीत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी डबेवाले पंढरपूरला जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

आषाढी एकादशीसाठी आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपुरात आज सर्वत्त भक्तीमय वातावरण असून अवघा महाराष्ट्रही विठुरायाच्या भक्तीत आणि पूजाअर्चांमध्ये व्यस्त आहे. ठिकठिकाणी मंदिरांमध्ये पखवाजाच्या आवाजासह भजणं आणि अभंगांच्या ओव्या ऐकू येत आहेत.

आपल्याला जीवनात, व्यावसायात सुख-समृद्धी लाभावी यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाकडे सर्वजण साकडे घालतात. यासाठीच मुंबईचे डबेवालेही पंढरपूरात दाखल झाले आहेत.

First Published on July 12, 2019 10:26 am

Web Title: mumbais dabbawalas are on a two day leave says subhash talekar aau 85
Just Now!
X