09 July 2020

News Flash

ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी, पाकिस्तानमधील कराचीमधून फोन

पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन

संग्रहित

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर ताज हॉटेलच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कराची येथून ताज हॉटेल बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर ताज हॉटेल आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच ताज हॉटेल समुद्राला लागून असल्याने समुद्रात गस्त वाढवण्यात आली असून लक्ष ठेवलं जात आहे.

धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. फोन आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवण्यासोबतच तपासही सुरु केला आहे. फोन आला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत.

ताज हॉटेल मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असून इथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. पण लॉकडाउनमुळे सध्या येथील परिसरात शांतता आहे. २६/११ हल्ल्यात दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले होते. यामुळे ताज हॉटेलबाहेर नेहमीच पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 9:37 am

Web Title: mumbais famous hotel taj has received a bomb threat from pakistan sgy 87
Next Stories
1 २०० ठिकाणी नाकाबंदी
2 मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांना १ हजार रुपये दंड
3 सरासरी गुणांचा अकरावीच्या विद्यार्थ्यांना फटका
Just Now!
X