News Flash

पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या बातम्या अफवा असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट

पर्रिकरांवर उपचार सुरुच; विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत

मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याने सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकणार नाहीत. दरम्यान, पर्रिकरांबाबत सध्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या सर्व अफवा असल्याचे लीलावती रुग्णालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.


पर्रीकर यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याने त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार करावे लागणार आहेत. डॉक्टरांनी पर्रीकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज देता येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे २२ फेब्रुवारी रोजी पर्रीकरांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत आहे. त्यामुळे ते विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण सादर करणार याबाबत भाजपच्या आमदारांची बैठकीत निर्णय होणार आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी १०.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 9:08 pm

Web Title: mumbais lilavati hospital and research centre issues statement rejecting rumours on goa cm manohar parrikars health
Next Stories
1 महाराष्ट्राचा विकास भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतिक : पंतप्रधान
2 बुलेट ट्रेन प्रकल्पात ८० हजार झाडांवर कुऱ्हाड?
3 केईएममध्ये आता स्पोर्ट्स मेडिसीन!
Just Now!
X