News Flash

लॉकडाउन शिथिल, पण मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचं काय? वडेट्टीवार म्हणतात…

मुंबईत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मात्र करोनाचं समूळ उच्चाटन झालेलं नाही. यासाठी प्रशासन काळजीपूर्वक पावलं उचलताना दिसत आहे.

मुंबईतल्या लोकल सेवेबद्दल महाराष्ट्र सरकारने नवा आदेश काढत खुलासा केला आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत ज्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर २० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटीव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यात निर्बंध वाढवण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत घट झाल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मात्र करोनाचं समूळ उच्चाटन झालेलं नाही. यासाठी प्रशासन काळजीपूर्वक पावलं उचलताना दिसत आहे. दुसरीकडे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली असली तरी लोकलबंदी कायम आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच तिकीट देण्यात आहे. मात्र सध्या सामान्य मुंबईकरांसाठी लोकलची दारं बंदच असणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली हे जिल्हे लॉकडाउन शिथिलीकरणाच्या दुसऱ्या गटात येत आहेत. मुंबईत रुग्ण वाढीचा दर कमी झाला तरच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. उपनगरीय रेल्वेशी संलग्न असलेला ठाणे जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा दिलेली नाही.

“मुंबईत करोना रुग्णवाढीचा दर कमी झाला तर लोकल सुरु करण्याचा विचार करू.  सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येईल”, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राज्यात अनलॉकची सुरुवात: जाणून घ्या कोणत्या टप्प्यात काय सुरु आणि काय बंद राहणार!

गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत २२ मार्च २०२० पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी देण्यात आली. काही महिन्यांनंतर सर्वसामान्यांना वेळेची मर्यादा घालून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने पुन्हा एकदा सामन्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती.

राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा!

मुंबईत मंगळवारी ९२५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९५ टक्क्यांवर गेलं आहे. सध्या मुंबईत १६ हजार ५८० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग ४७७ दिवसांवर पोहोचला आहे. २६ मे ते १ जून दरम्यान रुग्ण वाढीचा दर हा ०.१४ टक्के इतका होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 5:26 pm

Web Title: mumbais local train shut for common peolple till corona patient ratio decrease rmt 84
Next Stories
1 “ते ट्विट मी केलं नव्हतं,” ‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटवर महापौर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण
2 World Bicycle Day 2021 : सायकल संस्कृती… मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रदूषण, वाहतूक कोंडीच्या समस्यांवरील रामबाण उपाय
3 “तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात
Just Now!
X