सीरियामध्ये इसिसच्या बाजूने लढण्यास गेलेली मूळची मुंबईची असलेली ५५ वर्षीय महिला ठार झाल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे.
ठाण्यातून मे २०१४ मध्ये सीरियाला गेलेल्या फहाद शेखने याबाबतचे ट्विट केले आहे. सिरियाच्या पूर्वेला असलेल्या डेइर-एझ- झोर भागात या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे त्याने बुधवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, या महिलेचे नाव समजू शकलेले नाही.
हे ट्विट इंडियन मुजाहिद्दीनच्या ‘हॅश इंडियन मुजाहिद्दीन’ या हॅशटॅगला जोडून करण्यात आले आहे. डेइर-एझ- झोर या भागाचे नाव बदलून विलायत ए खैर असे ठेवण्यात आले आहे.