X
X

एकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श

READ IN APP

अनेक वेळा एकमेकांच्या धार्मिक स्थळांसमोरून वाजत गाजत मिरवणूक नेण्यास मनाई केली जाते. परंतु,

अनेक वेळा एकमेकांच्या धार्मिक स्थळांसमोरून वाजत गाजत मिरवणूक नेण्यास मनाई केली जाते. परंतु, ठाण्याजवळी मुंब्रा येथील एकता मंडळाने अनोखा आदर्श घालून दिला आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम लोकांनी मिळून एकाच मंडपात दोन्ही धर्माचे कसे पालन केले जाते याचे उदाहरण दिले आहे. दोन्ही समाजाची एकता आणि धार्मिक सहिष्णुता पाहून प्रत्येकाला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

मुंब्रा येथील एकता मित्र मंडळच्या गणेश मंडपात हिंदू समुदयाचे लोक बप्पाची भक्तीभावाने आरती करतात आणि तेवढ्याच भक्तीभावाने मुस्लीम समुदयाचे लोक अजान पुर्ण करतात. काल गुरूवारी मोहरामच्या दिवशी हिंदू-मुस्लीम एकताचे दर्शन येथे पहायला मिळाले.

‘अशा धार्मिक कार्यक्रमावेळी आम्ही साहित्याचे देवाण-घेवण करत असतो. त्याचप्रमाणे कधीकधी आम्ही एकच माईक वापरतो. यामुळे दोन समाजात एकता वाढते.’ असे येथीली एका स्थानिक व्यक्तीने प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.  दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ‘हिंदू आणि मुस्लीम यांच्यात कोणताच प्रकारचा भेदभाव नाही. राजकीय लोक हिंदू-मुस्लीमांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीपूर्वी राजकीय लोक स्वत:च्या फायद्यासाठी दोन धर्मामध्ये मतभेत निर्माण करतात.’

20
X