News Flash

इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी दोघांना अटक

शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी आणखी दोन जणांना अटक केली असून त्यामध्ये महापालिकेचा निलंबित सहाय्यक आयुक्त शाम थोरबोले आणि बिल्डरचा भागीदार

| April 12, 2013 03:31 am

शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी आणखी दोन जणांना अटक केली असून त्यामध्ये महापालिकेचा निलंबित सहाय्यक आयुक्त शाम थोरबोले आणि बिल्डरचा भागीदार हदिसउल्ला रकबुल्ला चौधरी यांचा समावेश आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने शीळ येथील इमारत दुर्घटने प्रकरणी आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक केली आहे. शाम थोरबोले याला दिव्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना लाचप्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी रंगेहात पकडले होते. त्यामुळे इमारत दुर्घटनाप्रकरणात त्याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 3:31 am

Web Title: mumbra building collapse two more arrested
Next Stories
1 क्रिकेटच्या वादातून तरुणाची हत्या
2 लाचखोरी करणारे मुंबईतील ३६ पोलिस निलंबित
3 सवलतींच्या साखरगाठी.. तरीही विक्रीची गुढी उतरती!
Just Now!
X