मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसा याला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई विमानतळावर अटक केली. दीड हजार कोटींच्या अंमलीपदार्थ तस्करीतही मुनाफ आरोपी आहे. मागीलवर्षी या तस्करीचाचा पर्दाफाश करण्यात आला होता. ही माहिती गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने दिली.
Gujarat Anti-Terrorism Squad (ATS): Munaf Halari Moosa arrested by ATS from Mumbai Airport, he was involved in drug trafficking worth Rs 1,500 crores, which was busted last year. He is also an accused in 1993 Mumbai bomb blasts.
— ANI (@ANI) February 10, 2020
या अगोदर मागील महिन्यात देशभरातील साधारण ५० बॉम्बस्फोटांसह १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी उर्फ ‘डॉ.बॉम्ब’ हा मुंबईतून बेपत्ता झाला होता. अन्सारीचा पॅरोल संपणार होता यानंतर त्याला अजमेर तुरूंगात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या अगोदरच पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाला होता. मात्र, पोलिसांनी नंतर त्याला कानपूरमधून अटक केली. त्याच्यावर १९९२ पासून सहा बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप आहेत. त्याला अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 11:33 am