स्वतंत्र मराठी रंगभूमी भवनाची आवश्यकता नसल्याचे कारण देत पालिका प्रशासानाने सोमवारी यासंबंधीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे मराठी रंगभूमी भवनासाठी आग्रही असणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपची नाच्चकी झाली आहे. चार वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात मराठी रंगभूमी भवना ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र याला फारसे महत्व न देत, पालिकेने संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्याकरता पालिकेच्या मालकीच्या नाटय़गृहात वर्षांतील काही दिवस राखीव ठेवणे शक्य असून संगीत रंगभूमीची परंपरा संभाळली जाऊ शकते. त्यामुळे स्वतंत्र रंगभूमी भवन उभारणे संयुक्तीक वाटत नसल्याचे पालिका प्रशासाने अभिप्रायाद्वारे सभागृहात कळवले आहे.