28 October 2020

News Flash

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून इकबाल सिंह चहल हे विजेते ठरले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून ‘आयएसीसी कोविड क्रुसेडर्स २०२०’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दृक्श्राव्य माध्यमातून झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात चहल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दुतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला. भारतात तसेच अमेरिकेत कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेल्या विविध व्यक्ती, संस्था यांना गौरवण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले.

भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून इकबाल सिंह चहल हे विजेते ठरले आहेत. या संवर्गासाठी ४१ जणांची नावे नामांकन म्हणून निश्चित करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:29 am

Web Title: municipal commissioner chahal honored by indo american chambers of commerce abn 97
Next Stories
1 प्राणवायू, अतिदक्षता विभागातील खाटा वाढवा!
2 मुंबईत दिवसभरात १,८७६ रुग्ण; ४८ मृत्यू
3 राज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी
Just Now!
X