मुंबई :  मुंबई आणि सुरत महापालिकेच्या कंत्राटदाराला दोन कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घालणा ऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या कांदिवली कक्षाने बेड्या ठोकल्या. रेल्वेचे डबे जोडणा ऱ्या ‘हॉर्स पाईप’चा पुरवठा करण्याचे कं त्राट मिळवून देतो, असे सांगून भामट्यांनी कंत्राटदाराला जाळ्यात ओढले होते.

हॉर्स पाईपचे कं त्राट मिळवून देण्यावर भामटे थांबले नाहीत, तर आपल्याच एका साथीदाराला हॉर्स पाईप उत्पादक म्हणून कंत्राटदारासमोर उभे केले. या व्यावसायिकाकडून स्वस्तात माल घ्यायचा आणि रेल्वेला चढ्या भावाने विकायचा, अशी कल्पना भामट्यांनी कं त्राटदारासमोर ठेवली. कंत्राटदाराला ही कल्पना पटली. भामट्यांनी रेल्वेची बनावट कागदपत्रे तयार करून हॉर्स पाईप पुरविण्याचे कंत्राट आपल्याला मिळाले, असा आभास निर्माण के ला. भामट्यांनी भुसावळ, नाशिकसह राज्याच्या विविध भागांमध्ये रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या ट्रककडे बोट दाखवून उत्पादकाकडून आपण विकत घेतलेले हे हॉर्स पाईप रेल्वेला पाठवत आहोत, असे कं त्राटदाराच्या गळी उतरवले. या मुरलेल्या कंत्राटदाराने एकदाही भामट्यांनी समोर ठेवलेली कागदपत्रे, उत्पादकाकडून विकत घेतलेले हॉर्स पाईप वास्तवात आहेत का याची खातरजमा कधीच केली नाही. कं त्राटदाराला भामट्यांनी दाखवलेले ट्रक मोकळे होते. रेल्वेकडून पैसे टप्प्याटप्प्याने येतील तोवर हॉर्स पाईप उत्पादकाचे बिल चुकते करण्याच्या नावाखाली भामट्यांनी या कं त्राटदाराकडून दोन कोटी ७० लाख रुपये उकळले. बरेच महिने झाले तरी रेल्वेकडून पैसे न आल्याने कं त्राटदाराच्या मनात शंके ची पाल चुकचूकली आणि त्याने चौकशी सुरू के ली. असे कोणतेही कं त्राट दिले नव्हते, असे रेल्वेने स्पष्ट करताच कं त्राटदार भानावर आला. त्याने भामट्यांशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. तेव्हा त्याला खोट्या प्रकरणात गुंतवण्याची आणि ठार मारण्याची धमकी मिळाली. त्याने याप्रकरणी गुन्हे शाखेकडे अर्ज के ला होता. कांदिवली कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने, सहायक निरीक्षक शरद झिने, अंमलदार रव्ौिंद्र भांबिड, जयेश के णी, अजय कदम आणि पथकाने मयूर सोळंकी, किरण चौहान आणि सुभाष सोळंकी या तीन भामट्यांना अटक के ली. यापैकी एका आरोपीविरोधात नाशिकमध्ये मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती. तर एक साथीदार रेल्वेत सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत आहे.