News Flash

महापालिकेचा ग्रीस घोटाळा

या ग्रीस खरेदीत महापालिकेचे दोन कोटी १९ लाख रूपयांचे नुकसान झाले

७१ रुपये किलोने मिळणाऱ्या ग्रीसची २७८५ रुपयांना खरेदी

नालेसफाई, खड्डे भरणे, रस्ते घोटाळा अशा घोटाळ्यांच्या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. या महापालिकेच्या उदंचन केंद्रासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून ७१.२८ रूपये किलो दराने खरेदी करण्यात येणारे ग्रास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुरवठादार कंपनीसी संगनमत करून तब्बल २७८५ रूपये किलो दराने खरेदी केल्याच्या घोटाळ्याची फेरचौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

महापालिकेत झालेल्या या कोटय़वधी रूपयांच्या ग्रीस खरेदीबाबत गिरीशचंद्र व्यास यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनिल तटकरे, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या ग्रीस खरेदीत महापालिकेचे दोन कोटी १९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून विभागीय चौकशीत २७ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. झालेले नुकसान या अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसुल करण्यात येत आहे. मात्र हा प्रकार अत्ंयत गंभीर असल्याने त्या संपूर्ण प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले जातील. तसेच दोषी अधिकाऱ्याना कठोर शिक्षा करण्याबाबतही आयुक्तांना सांगितले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी याव़ेळी स्पष्ट केले.

महापालिकेत सातत्याने नव नवीन घोटाळे उघडकीस येत असून महापालिकेच्या कारभाराचे कॅगमार्फत लेखापरिक्षण करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र ही मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:08 am

Web Title: municipal corporation greece scam
Next Stories
1 विदर्भच्या वादात रामदास आठवलेंची उडी
2 लावण्यसम्राज्ञींचा ‘तोरा’ फक्त सौंदर्यस्पर्धापुरताच!
3 तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई?
Just Now!
X