04 July 2020

News Flash

‘नायर’मधील दांडीबहाद्दरांना पालिकेची नोटीस

४९५ पैकी २९१ कर्मचाऱ्यांना ई-मेल आणि व्हॉटस्अ‍ॅपवर अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर प्रशासनाला कोणतीही कल्पना न देताच दोन महिन्यांहून अधिक काळ रजेवर गेलेल्या पालिकेच्या नायर रुग्णालयातील ४९५ पैकी २९१ कर्मचाऱ्यांना ई-मेल आणि व्हॉटस्अ‍ॅपवर अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

उर्वरित २०४ कर्मचाऱ्यांचे ई-मेल वा व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक प्रशासनाकडे नसल्यामुळे त्यांना टपालाने नोटीस पाठविण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर पालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय ‘करोना रुग्णालय’ म्हणून जाहीर केले. मात्र तत्पूर्वीच प्रशासनाला  कल्पना न देता रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थश्रेणीतील ४९५ कर्मचाऱ्यांनी भीतीमुळे रुग्णालयात येणे बंद केले होते. पालिकेने त्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहनही वारंवार केले होते. मात्र आजतागायत ते गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ७२ तासांची अंतिम नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

७२ तासात कार्यालयात उपस्थित न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करुन त्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही चहल यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 12:58 am

Web Title: municipal notice to staff in nair abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बाजारपेठांनी धूळ झटकली, पण..
2 पाळीव श्वानांना घराबाहेर २० मिनिटे फिरवण्यास मुभा
3 सामायिक प्रवेश परीक्षेचे केंद्र बदलता येणार
Just Now!
X