पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती आणि अनुषंगिक परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्ष २४ विभागीय कार्यालयांतील नियंत्रण कक्षांशी जोडण्यात आला आहे.
पालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षामध्ये अद्ययावत संकगणकीकृत सुविधांसह बिनतारी संदेश यंत्रणा, हॅम रेडिओ सज्ज करण्यात आले असून ५४ ठिकाणच्या ६० स्वयंचलित हवामान केंद्राशी कक्ष जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर मंत्रालय, अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, बेस्ट उपक्रम, राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्रतिसाद पथक, रिलायन्स एनर्जी, मध्य व पश्चिम रेल्वे आणि रुग्णालये आदी २३ यंत्रणांशी पालिकेचा मुख्य नियंत्रण कत्र हॉटलाईनद्वारे जोडण्यात आला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसाची घरबसल्या माहिती मिळावी यासाठी http://www.mumbaimonsoon.com  सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांनी मदतीसाठी  टोल-फ्री क्रमांक १०८, १९१६, दूरध्वनी क्रमांक २२६९४७२५, २२६९४७२७, २२७०४४०३, २२६९४७१९ वर संपर्क साधावा.