भांडुप येथे क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
भांडुप येथे राहणारे अनिल पांडे यांच्या कुत्र्याने क्रिकेट खेळणाऱ्यांचा चेंडू तोंडात पकडला आणि चावून टाकला. या प्रकारामुळे संतप्त झालेले १३ जण पांडे यांच्या घरी गेले. उभयतांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जाब विचारण्यासाठी गेलेल्या १३ जणांनी तलवार आणि चाकूने पांडे यांच्यावर वार केले. त्यात पांडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.