24 November 2020

News Flash

सांताक्रूझमध्ये छेड काढल्याप्रकरणी तरुणाची हत्या

पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक

(संग्रहित छायाचित्र)

तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार सांताक्रूझ परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली. मयूर जोशी (२९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गेल्या आठवडय़ात मयूरने त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची छेड काढली होती. हा प्रकार तिने आपल्या एका मित्राला सांगितला. त्याने शुक्रवारी चार ते पाच साथीदारांसह मयूर याला गाठले. त्या सर्वानी भररस्त्यात मयूरला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रविवारी मयूरचा मृत्यू झाला.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणावरून पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:18 am

Web Title: murder of a young man in santa cruz abn 97
Next Stories
1 राज्यात निर्बंध लागू करण्याचा विचार
2 शिक्षक अद्यापही संभ्रमात
3 थंडीची प्रतीक्षाच..
Just Now!
X