09 April 2020

News Flash

घराबाहेर पडण्याच्या वादातून तरुणाची हत्या

राबाहेर पडण्याच्या वादातून सख्ख्या भावाने धाकटय़ा भावाची हत्या केली

संग्रहित छायाचित्र

 

करोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडण्याच्या वादातून कांदिवलीत सख्ख्या भावाने धाकटय़ा भावाची हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कांदिवलीतील पोयसर परिसरात घडली. दुर्गेश ठाकूर(२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करत होता. मात्र करोनाच्या संसर्गामुळे तो मुंबईत आपल्या भावाकडे परतला. भाऊ राजेश केशकर्तनालयात मजुरी करतो. बुधवारी सकाळी राजेश आणि त्याची पत्नी भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत होते. तेव्हा दुर्गेशने त्यांना रोखले. बाहेर पडू नये, अशी विनंती त्याने दोघांना केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राजेश आणि त्याची पत्नी घराबाहेर पडले. खरेदी करून आल्यानंतर राजेश आणि दुर्गेश यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात दुर्गेशने वहिनीच्या श्रीमुखात भडकावली. ते पाहून राजेशने स्वयंपाक घरातील तवा दुर्गेशच्या डोक्यात घातला. हा घाव दुर्गेशच्या वर्मी बसला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेशला अटक केल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू काबे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:07 am

Web Title: murder of a young man on the verge of leaving the house abn 97
Next Stories
1 पुढील शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक कोलमडणार
2 आठ खासगी प्रयोगशाळांत करोना तपासणी
3 करोनाच्या धास्तीने खासगी दवाखान्यांची रुग्णांकडे पाठ
Just Now!
X