News Flash

मुंबईत वृद्ध दाम्पत्याची गळा दाबून हत्या ?

वांद्रे परिसरातील एकता डिलाईट इमारतीत माखिजा दाम्पत्य राहतात. दया माखिजा आणि नानक माखिजा असे मृत वयोवृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.

प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या एकता डिलाईट इमारतीत राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली आहे. दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. दया माखिजा आणि नानक माखिजा असे मृत वयोवृद्ध दाम्पत्याचे नाव असून गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वांद्रे परिसरातील एकता डिलाईट इमारतीत माखिजा दाम्पत्य राहतात. बुधवारी रात्री दरोड्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचा गळा दाबून खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 2:22 pm

Web Title: murder of old age couple in bandra mumbai for theft intention
Next Stories
1 मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कट ऑफमध्ये तीन टक्क्यांची वाढ
2 भाजपा आणि पंतप्रधान मोदींमुळे संविधानाला धोका निर्माण झालाय: शरद पवार
3 अग्नितांडव! मालाडमध्ये कंपनीत तर मुंब्रा येथे गोदामात आग
Just Now!
X