News Flash

धारदार शस्त्राने प्लंबरची हत्या

एका प्लंबरची धारदार शस्त्राने डोके व गुप्तांगावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मीरा रोडच्या गोकुळ व्हिलेजमध्ये घडली आहे. डी विंगमधील तळमजल्यावर चेरियन राजू

| January 22, 2013 03:06 am

एका प्लंबरची धारदार शस्त्राने डोके व गुप्तांगावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मीरा रोडच्या गोकुळ व्हिलेजमध्ये घडली आहे. डी विंगमधील तळमजल्यावर चेरियन राजू यांचे जी. आर. इंजिनीअरिंग वर्क नावाचे वेल्डिंग कामाचे दुकान आहे. अविवाहित असलेला जॉन्सन वर्गीस (४४) हा गेल्या १०-१२ वर्षांपासून शांती पार्क परिसरातच प्लंबरचे काम करायचा. राजू व जॉन्सन दोघेही केरळचे असल्याने महिन्याभरापूर्वीच राजू यांनी जॉन्सनला आपल्या दुकानात काम करण्यास व दुकानात झोपण्यासाठी परवानगी दिली होती.
वेल्डर म्हणून कामाला लागलेला पंचम (२५) मूळ रा. मध्य प्रदेश हादेखील दुकानात राहत असे. आज सकाळी राजू दुकानात आले असता जॉन्सन त्यांना मृतावस्थेत आढळला. तर पंचम बेपत्ता होता. हत्येचा प्रकार कळताच मीरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पंचमचा शोध सुरू असल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी सांगितले. जॉन्सन यांच्या मृतदेहाची स्थिती पाहता समलैंगिक संबंधांच्या वादातून हत्या झाल्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:06 am

Web Title: murdered of plumber
Next Stories
1 ..आणि उच्च न्यायालयातच घरांची बोली लागली!
2 राज्यात १२ सिलिंडर सवलतीमध्ये द्या !
3 फरारी आरोपींची संख्या घटली!
Just Now!
X