चेंबूर जिमखानाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र शर्मा, दिनेश घाटे (स्वर आलाप चे संस्थापक मुंबई), डॉ. अमित एम. गुप्ता (टाटा मेमोरियल हॉस्पिटल) आणि  विनय अग्रवाल यांनी “ट्री ऑफ होप” हा कर्करोग जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम चेंबूर जिमखाना आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलने यांच्या साह्याने संपन्न झाले म्हणून सादर केले.झालेल्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे होते की ह्यात ७ वर्षीय केशव अग्ररवाल आणि ६ वर्षीय कियारा मित्तल कर्करोगाबद्दल बोलले.

“प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संगीत हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण सगळ्या रोगांसाठी उपचारात्मक थेरपी म्हणून संगीत मह्तवपूर्ण काम करते. असे ६ वर्षीय कायरा मित्तलने येथे सांगितले “आपल्याला तंबाखू उत्पादनांच्या प्रतिकूल प्रभावांबद्दल जागरुकता निर्माण केली पाहिजे जेणेकरून  फुफ्फुसाचा कर्करोग कमी होईल. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपण आपल्या सभोवतालच्या परिसरात झाडे लावावीत. असे ७ वर्षीय केशव अग्रवालने सांगितले. “आयुष्यातील संगीत हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण सर्वकाहीसाठी रोग उपचारात्मक थेरपी म्हणून वापरले जाते, म्हणून संगीत खूप महत्वाचे आहे,” असे 6 वर्षीय कायरा मित्तल यांनी सांगितले.

“ट्री ऑफ होप असे सूचित करते की आपले मुळे मजबूत असणे आवश्यक आहे. तरुणांना मधील बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग ७०% पर्यंत पोहचला आहे. येणारी पिढी आपल्या भारताचे भविष्य आहे. हा उपक्रमाद्वारे युवकांना कर्करोगा विषयी शिक्षित करणे. हाच ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.” असे टाटा मेमोरियल हॉस्पिटल चे डॉ. अमित गुप्ता यांनी सांगितले.

कार्यक्रमात टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉक्टरस कर्करोग जागरूकता बद्दल प्रशिक्षण दिले याच सोबत सामान्य लोकांना संबोधित करण्यासाठी स्ट्रीट प्ले सादर केले. येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी कर्करोग संबधित सामाजिक जाहिरात फिल्म, डॉक्यूमेंटरी / माहिती दाखवण्यात आले. कर्करोग जागरूकता व प्राथमिक स्तरावर त्याचा प्रतिबंधक कसा करावा याबद्दल ऑन्कोलॉजिस्टच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.