21 September 2020

News Flash

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या- संजय राऊत

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रातून मांडले आहे.

| April 12, 2015 02:47 am

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रातून  मांडले आहे.
मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे, तेव्हाच मुस्लीम व्होट बॅकिंगचं राजकारण थांबेल.  मुस्लीम ‘व्होट बँक’ हा आता चिंतेचा तितकाच डोकेदुखीचा विषय बनला. मुसलमानांचे दु:ख, दैन्य, अज्ञानाच्या नावाखाली प्रत्येक जण या ‘व्होट बँके’चेच राजकारण करीत असतो. कधीकाळी मुस्लीम मते ही कॉंग्रेसची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी संपली. त्यामुळे आपल्याविरोधात ‘मुस्लीम’ मते खाणारा उमेदवार उभा राहू नये यासाठी ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारा प्रत्येक उमेदवार शर्थ करीत असतो व त्यासाठी तो सौदेबाजी करतो, असे राऊत यांनी म्हटले आहे. मतांचे राजकारण आणि सौदेबाजी रोखण्यासाठी या समाजाचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा, अशी मागणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केली होती, अशी आठवणही राऊत यांनी या सदरात केली आहे. मुस्लिम मतांचा अधिकार काढून घेतल्यास धर्मनिरपेक्षवाद्यांचे मुखवटे गळून पडतील, असे सांगत राऊत यांनी ओवेसी बंधुंचा सापाची पिल्ले असा उल्लेख केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 2:47 am

Web Title: muslims voting rights should be revoked to end vote bank politics sanjay raut
टॅग Sanjay Raut
Next Stories
1 आता निकालाचा तणाव!
2 शोभा डे यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल
3 वांद्र्यात पोलिसांकडून सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेण्याचा धडाका
Just Now!
X