23 January 2021

News Flash

मुंबई होणार अधिक वेगवान; ‘या’संदर्भात झाले सामंजस्य करार

अनेक प्रकल्पांना मिळणार गती

संग्रहित

एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर एस खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा हे उपस्थित होते. दरम्यान, या करारांमुळे अनेक प्रकल्पांना गती मिळणार आहे.


या करारामुळे खालील प्रकल्पांना वेग येईल.


  • पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे २७८३ कोटी
  • ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी उन्नत रेल्वे मार्ग बांधणे.४७६ कोटी
  • विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) ३५७८ कोटी
  • नवीन रेल्वे गाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) ३४९१ कोटी
  • मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल. ५५१ कोटी
  • तसेच तांत्रिक सहाय्य ६९ कोटी
  • मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-III) या रु.१०,९४७ कोटी प्रकल्प पुर्णत्व किमंतीच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पास मंजूरी दिली होती.
  • राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा- २ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 7:55 am

Web Title: mutp 3 projects sign mutual agreement railway lines new projects cm uddhav thackeray jud 87
Next Stories
1 यंत्रणेतील समन्वयाअभावी रुग्णवाढ
2 जनतेच्या विरोधामुळे रत्नागिरीत टाळेबंदी शिथिल
3 वाडय़ातील कचराभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Just Now!
X