01 December 2020

News Flash

मुंबई महापालिकेचं पथक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या अंतर्गत आरोग्य पथक बिग बींच्या दारी

फोटो सौजन्य-मुंबई महापालिका ट्विटर

मुंबई महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्याचं पथक आज महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर तपासणीसाठी गेलं होतं. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ठाकरे सरकारने सुरु केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत शनिवारी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं पथक पोहचलं. अमिताभ बच्चन यांनी स्वागत करत सगळ्यांना माहिती दिली. सुरुवातीला सगळे कर्मचारी महानायकाच्या बंगल्यावर पोहचल्यानंतर काही वेळ दडपणाखाली होते. मात्र अमिताभ बच्चन यांनी अत्यंत सहजपणे संवाद साधत या सगळ्यांना माहिती दिली. आपल्या वागणुकीतून त्यांनी सुखद धक्का देत या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आलेलं काहीसं दडपण दूर केलं.

करोनाविरोधातल्या लढ्यात सगळ्यांनी सहकार्य केलं तरच आपण करोनाला रोखू शकतो असंही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. तसंच अमिताभ बच्चन यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचं कौतुकही केलं. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन या तिन्ही कलाकारांना करोना झाला होता. त्यातून हे तिघेही बरे झाले आहेत. त्यामुळे घरी आरोग्य तपासणीसाठी आलेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी आरोग्यविषयक माहिती सविस्तरपणे दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 11:22 pm

Web Title: my family my responsibility bmc health workers visit amitabh bachchans residence in mumbai scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 …या बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे – संजय राऊत
2 मुंबईकरानो, मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करावी लागेल रस्त्यावर साफसफाई
3 शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं आईनं मुलीला पेन्सिलनं भोसकलं; मुंबईतील हादरवून टाकणारी घटना
Just Now!
X