अपुरे मनुष्यबळ, अ‍ॅपमधील दोष कारणीभूत

मुंबई : करोना निर्मूलनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत स्वयंसेवकांचा अपुरा ताफा, अपुऱ्या मनुष्यबळामुळे होणारे वाद, अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी असे अडथळे उभे रहात आहेत.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईत ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. मोहिमेसाठी एक पालिका कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक अशा तिघांचा समावेश असलेली पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले होते.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आरोग्य सेवांचा प्रचार आणि प्रसाराचे काम मानधनावर करणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांवर या मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जोडीला पुरेशा स्वयंसेवकांची फौज उभी करण्यात पालिकेला अपयश आले आहे. काही विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी आरोग्य स्वयंसेविकांना त्यांच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सूचना केली आहे. परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत आहे.

मदतनीस देण्याची मागणी

कुटुंबातील सदस्यांचे तापमान, प्राणवायू तपासणे, मार्गदर्शन करणे, कुटुंबांतील सदस्यांच्या नोंदीही करणे अशी सगळी कामे आम्ही कशी काय करायची, असा सवाल आरोग्य स्वयंसेविकांनी उपस्थित केला आहे. तोडगा म्हणून आरोग्य स्वयंसेविका एकमेकींना मदत करत आहेत. मात्र कामात प्रचंड घोळ होत असून मदतीला दोन स्वयंसेवक द्यावे, अशी मागणी वारंवार आरोग्य स्वयंसेविकांकडून होत आहे.