News Flash

माहिम किनारी सापडलेल्या बॅगेतील मानवी अवशेषांचे गूढ उकलले

लैंगिक अत्याचाराला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन प्रियकरासह हत्या केल्याची माहिती या प्रकरणाच्या तपासातून पुढे आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या मानवी अवशेषांचे गूढ पोलिसांनी उलगडले. लैंगिक अत्याचाराला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन प्रियकरासह हत्या केल्याची माहिती या प्रकरणाच्या तपासातून पुढे आली आहे.

माहिम समुद्रकिनाऱ्यावर २ डिसेंबर रोजी संध्याकाळी वाहून आलेल्या बॅगमध्ये मानवी अवशेष सापडले होते. हे अवशेष बेनेट रिबेलो (५९) या कलावंताचे असल्याचे उघडकीस आले आहे. बेनेट यांची हत्या २६ नोव्हेंबरला सांताक्रूझ येथील घरीच करण्यात आली. बांबू आणि चाकूने वार करूनही बेनेट यांचा मृत्यू होत नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर डास मारण्याचे औषध फवारण्यात आले. त्यानंतर तीन दिवस बेनेट यांचा मृतदेह घरातच होता. दोन्ही आरोपींनी याच घरात वास्तव्य केले. बेनेट यांच्या शरीराच्या अवयवांसोबत त्यांचे काही कपडे सुटकेसमध्ये होते. त्यातील शर्टवरील स्टिकरवरून पोलिसांनी कुर्ला येथील एका टेलरला शोधले. त्यानेच हा शर्ट शिवला होता. त्याच्याकडील नोंदी आणि समाज माध्यमांवरील अस्तित्वावरून हे अवशेष बेनेट यांचेच असल्याचे उघड झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:43 am

Web Title: mysterious remains of the human remains of the bag found on the coast of mahim abn 97
Next Stories
1 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय समिती
2 आयआयटी टेकफेस्टमध्ये यंदा ‘पब्जी’चा समावेश
3 मुंबईत आता संध्याकाळीही साफसफाई
Just Now!
X