28 November 2020

News Flash

वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण होण्याआधीच नशीबानं सोडली साथ, डान्सर विनोद ठाकूर ICU त दाखल

१८ मार्चला त्यानं आपल्या प्रवासाला सुरूवात केली. ४० दिवसांत दीड हजार किलोमीटरचं अंतर कापून तो मुंबईत पोहोचणार होता.पण, प्रवासात मालाडदरम्यान तो चक्कर येऊन कोसळला.

गिनीझ बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी विनोद प्रयत्न करत होता.

‘नच बलिये’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ यांसारख्या रिअॅलिटी शोमधून परिचयाचा चेहरा असलेला विनोद ठाकूर सध्या आयसीयुत दाखल आहे. विनोद दिव्यांग आहे. पाय नसल्यानं त्याचं आयुष्य इतरांसारखं साधं सरळ नक्कीच नव्हतं. पण, नशीबात आलेल्या दु:खाला तो मोठ्या हिमतीनं समोरा गेला. नृत्यात त्यानं प्रभुत्त्व मिळवलं. जे अशक्य होतं ते विनोदनं शक्य केलं. आपल्या असामान्य जिद्द आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर त्यानं संपूर्ण देशवासीयांची मनं जिंकली. विनोद वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण करणार होता. पण, इथेही नियतीनं क्रूर थट्टा केली हा रेकॉर्ड पूर्णत्त्वास जाण्याआधी त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला सध्या रक्षा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दिल्लीतल्या इंडिया गेट पासून ते मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत व्हिलचेअरनं प्रवास करण्याचा विक्रम विनोद रचणार होता. १८ मार्चला त्यानं आपल्या प्रवासाला सुरूवात केली. ४० दिवसांत दीड हजार किलोमीटरचं अंतर कापून तो मुंबईत पोहोचणार होता. पण, प्रवासात मालाडदरम्यान तो चक्कर येऊन कोसळला. ३० एप्रिलला गेट वे ऑफ इंडियाला त्यानं पोहचणं अपेक्षित होतं. डिहायड्रेशन, कमी रक्तदाब तसेच थकवा आल्यामुळे त्याची तब्येत बिघडली असल्याची माहिती रक्षा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव यांनी दिली. गिनीझ बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी विनोद प्रयत्न करत होता. मात्र व्हिलचेअरवरून मुंबई गाठण्याचं त्याचं स्वप्न मात्र पूर्णत्त्वास येत असतानाच हुकलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 2:07 pm

Web Title: nach baliye fame dancer and athlet vinod thakur hospitalised
Next Stories
1 #DusKaDum : ‘जिसे जिंदगी सिखायें, उसे कौन हराये?’
2 … तर मग पौराणिक सिनेमेच बनवावे लागतील – सचिन कुंडलकर
3 VIDEO : निधनाच्या अफवांविषयी खुद्द मुमताज काय म्हणतायेत पाहिलं का?
Just Now!
X