व्यापाऱ्यांना लुटून मुंबई आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात नाडर टोळीतील तीन जणांना जबरी दरोडा आणि चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. या टोळीच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
 १० जुलै रोजी कांदिवली येथील गंगर ट्रेडिंग कंपनीचे मालक बॅंकेत रोख रक्कम भरण्यासाठी जात होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास समता क्रीडा भवनाजवळ त्यांच्या स्विफ्ट गाडीसमोरमारुती एस्टीम गाडी आडवी आली. त्यातून उतरलेल्या चौघांनी हॉकी आणि चॉपरच्या सहाय्याने व्यापाऱ्याच्या गाडीवर हल्ला करून व्यापाऱ्याकडील ८ लाख रुपये रोख रक्कम लुटली होती. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास करून कुख्यात नाडर टोळीतील अधिष्टराज नाडर, रामचंद्रन तेवर आणि पेरईस्वामी नाडर या तिघांना अटक केली. या टोळीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलुंड येथील थलिया इन्व्हेस्टमेंट कंपनीची ३० लाख रुपयांची रोकड अशाच पद्धतीने लुटली होती. या टोळीच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी दिली.