News Flash

संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांशी संबंध, घाटकोपरमधून एकाला अटक

एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारा व राज्याच्या अन्य भागांमधून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य आरोपींना अटक केली होती.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नालासोपारा स्फोटक प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी रात्री घाटकोपरमधून ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून त्याला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारा व राज्याच्या अन्य भागांमधून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य आरोपींना अटक केली. या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कट आखल्याची माहिती पुढे आली. या सर्व आरोपींचा सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप  केला जात आहे.

एटीएसच्या तपासात या प्रकरणात घाटकोपर येथील ३० वर्षांच्या तरुणाचा सहभाग असल्याचे समोर आले. या तरुणाला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. त्याला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा तरुण कोण आहे, त्याचा गुन्ह्यातील नेमका सहभाग काय याचा तपशील अद्याप पोलिसांनी दिलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 10:50 am

Web Title: nallasopara blast plot ats arrested 30 year old man from ghatkopar
Next Stories
1 मेट्रोच्या रात्रकामाला परवानगी!
2 प.रे.च्या शहरातील स्थानकांना उतरती कळा
3 राष्ट्रीय उद्यानातील ‘तारा’ला सिताऱ्याचा आधार
Just Now!
X