07 August 2020

News Flash

राणेंचे समर्थक पडते शिवसेनेत

‘नारायण राणे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे,’ अशा घोषणा शिवसेनेला उद्देशून देणारे राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक राणे यांनाच कंटाळून शिवसेनेत प्रवेश करू लागले

| February 1, 2015 01:17 am

‘नारायण राणे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे,’ अशा घोषणा शिवसेनेला उद्देशून देणारे राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक राणे यांनाच कंटाळून शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. कालिदास कोळंबकर यांचा अपवाद वगळता २००५ मध्ये राणे यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या बहुतांशी प्रमुख कार्यकर्त्यांनी अन्य मार्ग पत्करला आहे.
राणे यांचे कुडाळमधील कट्टर समर्थक संजय पडते यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार विनायक निम्हण यांनी शिवसेनेचा मार्ग पत्करला होता. राणे यांच्या मुलांना महत्त्व मिळू लागल्याने कोकणातील काही प्रमुख कार्यकर्ते विरोधात गेले. त्यातच राणे पिता-पुत्राच्या पराभवानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राणे यांना सोडचिठ्ठी दिली. राजन तेली आणि संजय पडते हे सुरुवातीपासून राणे यांचे खास समर्थक मानले जायचे. तेली आधीच बाहेर पडले. रवी फाटक यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2015 1:17 am

Web Title: narayan rane follower sanjay padte set to join shiv sena
टॅग Narayan Rane
Next Stories
1 मनसे वाढणार, कामाला लागा!
2 अल्पसंख्याक संस्था तेजीत
3 मुंबईत पुन्हा पाणीकपात
Just Now!
X