News Flash

रिफायनरी प्रकल्पात उद्धव ठाकरेंचे साटेलोटे – राणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या परवानग्या द्यायला सांगितल्या.

रत्नागिरी जिल्हय़ातील नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी परवानग्या मिळवून दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या परवानग्या द्यायला सांगितल्या. एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटून विरोध करायचा आणि दुसरीकडे कंपनीशी साटेलोटे करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष  नारायण राणे यांनी गुरुवारी केला.

जोवर लोकांची सहमती नसेल तोवर नाणारचा सामंजस्य करार करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले. कोकणातील रिफायनरीला माझा विरोध कायम आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ग्रामस्थांचे मन वळवणार; पण कोकणी माणूस मुख्यमंत्र्यांचे ऐकणार की राणेंचे , असा सवालही त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आता मी भविष्य काही सांगू शकत नाही. माझे भविष्य खरे ठरलेले नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगण्याचे धाडस मी करणार नाही; भाजपला सरकारची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतील, असेही सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. निवडणुकीपूर्वी भाजप सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. अन्यथा  राजकीय पक्षांना विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लीम व धनगर समाजालाही आरक्षण लागू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

नारायण राणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 4:27 am

Web Title: narayan rane make allegation on uddhav thackeray over refinery project
Next Stories
1 मुंबईत २८ फेब्रुवारीला राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा
2 ‘आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा प्रयत्न उधळून लावू’
3 ‘नीट’ परीक्षेचा अर्ज भरायचा की नाही?
Just Now!
X