News Flash

वांद्रे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची नारायण राणेंना साथ?

वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपला उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

| March 22, 2015 04:56 am

वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपला उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि शरद पवार यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, उमेदवारीची अधिकृत घोषणा उद्या दिल्लीतून होईल. त्यानंतर मंगळवारी राणे आपला अर्ज दाखल करणार असल्याचे कळते.
शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने यापूर्वीच उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे, तर काँग्रेसतर्फे नारायण राणे रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राणे यांनी पवारांशी उमेदवार न देण्याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. यामुळे आता ही लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:56 am

Web Title: narayan rane meets sharad pawar seeks ncps help in bandra east bypoll
Next Stories
1 जे. आर. डी. टाटा यांना ‘एअर एशिया’ची अनोखी सलामी
2 गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत फलकबाजीला ऊत
3 काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांना दालनात कोंडले
Just Now!
X