News Flash

वेळ पडल्यास राजीनामा फेकून देईन, नाणार प्रकल्पावरुन नारायण राणे आक्रमक

नाणारला एकही दगड रचू देणार नाही अशा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी दिला आहे

narayan rane

नाणारला एकही दगड रचू देणार नाही अशा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. तसंच वेळ पडल्यास फक्त शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची भेट नाकारली. करारावर स्वाक्षरी करण्यात आल्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नाराजी दूर करु असं धर्मेंद्र प्रधान बोलले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशासाठी अशी विचारणा करत भेट नाकारली.

यावेळी नारायण राणे यांनी प्लास्टिक बंदीवरही भाष्य केलं. व्यापाऱ्यांकडून पैसे काढण्यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 6:26 pm

Web Title: narayan rane opposes nanar project ready to resign
Next Stories
1 जळगावमध्ये मनसेला धक्का; १२ नगरसेवक सुरेश जैन गटात
2 शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
3 बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन मंजूर
Just Now!
X