News Flash

राणे विरुद्ध शिवसेना वादाचा नवा अध्याय

शिवसेना आणि राणे यांच्यात आतापर्यंत हिंसक संघर्षांची परंपरा आहे.

कोकणात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा राणे यांचा प्रयत्न

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात सुरू झालेल्या वादाची परंपरा राजापूर तालुक्यातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पावरूनही कायम राहिली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेला विषय हाती घेऊन राणे यांनी कोकणात आपली गेलेली राजकीय पत पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शिवसेना आणि राणे यांच्यात आतापर्यंत हिंसक संघर्षांची परंपरा आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर राणे यांनी शिवसेनेला सळो की पळो करून सोडले होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणे यांना शिवसेनेने दुहेरी झटका दिला. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत यांनी राणे यांचे पुत्र नीलेश यांचा पराभव केला. तर विधानसभा निवडणुकीत स्वत: राणेच पराभूत झाले. तेव्हापासून कोकणात राणे यांचे प्रस्थ कमी झाले आणि शिवसेनेने पुन्हा वर्चस्व निर्माण केले. कोकणात पुन्हा ताकद वाढविण्यासाठी राणे हे संधीच्या शोधात होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर भाजपने पक्षात अधिकृतपणे प्रवेश दिला नाही.  तसेच मंत्रिपदासाठी भाजपने त्यांना ताटकळत ठेवले.

कोकणातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे राणे यांना विषयच मिळाला. नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प हा केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात येणार असला तरी त्यावरून कोकणात राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. पण आंध्र प्रदेशातील हा प्रकल्प कोकणात आणण्यासाठी अनंत गिते आणि विनायक राऊत या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी पाठपुरावा केल्याचा गौप्यस्फोट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:10 am

Web Title: narayan rane shiv sena konkan politics
Next Stories
1 आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी बढती
2 ‘ऑनलाइन’ शिष्यवृत्ती योजना ‘ऑफलाइन’!
3 सिमी, इंडियन मुजाहिदीनची कुंडली कुरेशी मांडणार?
Just Now!
X