07 July 2020

News Flash

कोकणातील धूमशानमुळे भुजबळांची कोंडी!

काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात काम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस

| April 16, 2014 04:07 am

काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात काम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फटका आता नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना बसता आहे. राणे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे माणिकराव कोकाटे यांच्या गटाने उघडपणे भुजबळांविरोधात काम सुरू केले आहे.
सिंधुदुर्गातील काँग्रेस-राष्ट्रवादीमधील या राडय़ाचे पडसाद राज्यात इतरत्र उमटू लागले आहेत. नाशिक मतदारसंघात सिन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या सभास्थानीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या क्षोभाला वाट करून दिली. भुजबळ यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खदखदत असलेल्या नाराजीला सिधुदुर्ग मतदारसंघातील घडामोडींचे निमित्त मिळाले असून राणे पितापुत्रांच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेची परतफेड करण्यासाठीच सिन्नरमध्ये काँग्रेसने संधी साधून राष्ट्रवादीविरोधी पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. सिन्नर येथे आयोजित सभेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत भुजबळ विरोधाला वाट करून दिल्याने, या सभेकडे पाठ फिरविण्याची पाळी भुजबळ यांच्यावर आली. एकत्र निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच या मतभेदांनी तोंड वरकाढल्याने, उभय पक्षांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, काँग्रेस उमेदवार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील काँग्रेसराष्ट्र वादीमधील संघर्ष शरद पवार यांच्या कानपिचक्यांनंतर अधिकच चिघळला आहे. संवेदनशील बनू लागलेल्या या मतदारसंघाला पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचा वेढा पडला आहे. दोन्ही जिल्ह्य़ांत पाच हजार पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे व राखीव पोलीस दलाचे जवान आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रिाणे यांच्या विरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना सशस्त्र पोलिसांचे विशेष संरक्षण पुरविण्यात आले असून मतदारसंघात तणावपूर्ण शांतता अनुभवास येत आहे.

मतांसाठी मुंडे मनसेच्या दारात
मनसेला महायुतीत घेण्याचा आता प्रश्नच येत नाही, असे सांगून चार दिवसांपूर्वीच हात झटक णारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मतदारसंघात मदत क रण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाक रे यांचे दार ठोठावले. बीडमध्ये मनसेने मला पाठिंबा द्यावा, अशी विनंती क रणारा फोनच मुंडे यांनी राज यांना के ला. त्यावर राज यांनीही मंगळवारी सायंकोळी मुंडेंना पाठिंबा देत असल्याचे जाहीर के ले. राज ठाक रे हे सकोळी रंगशारदा येथे एको वृत्तवाहिनीमध्ये मुलाखतीसाठी जात असताना गोपीनाथ मुंडे यांचा दूरध्वनी आला. बीडमध्ये मनसेने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती मुंडे यांनी राज यांना के ली. यानंतर राज यांनी मुंडे यांना लेखी पाठिंबा देणारे पत्रक च कोढले. बीड लोक सभा मतदारसंघातून मुंडे यांना निवडून आणण्यासाठी मनसेच्या कोर्यक र्त्यांनी शर्थीचे प्रयत्न क रावे असे आवाहन राज यांनी केले.

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला
लोक सभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या टप्यातील १९ जागांसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संध्याकोळी थंडावली. उद्या गुरु वारी या सर्व मतदारसंघातील ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यासाठी मतदान होणार आहे. पुणे, बारामती, मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आदी १९ लोक सभा मतदार संघात ३५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सुमारे तीन कोटी २४ लाख मतदार त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. गृहमंत्री सुशीलकु मार शिंदे, गोपीनाथ मुंडे, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, पद्मसिंह पाटील, राजू शेट्टी यांच्यासारखे उमेदवार दुसऱ्या टप्यात रिंगणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2014 4:07 am

Web Title: narayan rane staunch supporter starting to work openly against bhujbal
Next Stories
1 … तर बाळासाहेबांनी मी पाठवलेले सुप घेतले असते का? – राज ठाकरे
2 मोहन रावले स्वगृही परतले; राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश
3 ‘हार्टब्लीड’मुळे अँड्रॉइड फोनला सर्वाधिक धोका!
Just Now!
X