News Flash

ड्रग्ज प्रकरण : एनसीबीच्या मुंबईत तीन ठिकाणी धाडी

ड्रग्ज प्रकरणाचा एनसीबीकडून सुरू आहे तपास

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) केला जात आहे. या तपासात सुरूवातीला एनसीबीनं काही जणांना अटक केली होती. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं नाव यामध्ये समोर आले होतं. या प्रकरणात बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींची नावंही समोर आली असून, आज (२५ सप्टेंबर) एनसीबीनं मुंबईत तीन ठिकाणी धाडी टाकल्या. एएनआयनं हे वृत्त दिलं आहे.

ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. यात बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींची नावंही समोर आली होती. त्यांची चौकशी केली जाणार असून, एनसीबीनं समन्स बजावलं आहे. त्यापैकी आज रकुल प्रीत सिंहची चौकशी केली जाणार आहे. त्यापूर्वीच एनसीबीनं मुंबईतील तीन ठिकाणी ड्रग्ज प्रकरणात छापेमारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीनं शुक्रवारी सकाळी अचानक अंधेरी आणि पोवईत ही कारवाई केली आहे. कारवाईची विस्तृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यापूर्वी एनसीबीनं केलेल्या कारवाईत ड्रग्ज सापडले होते.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. मात्र आपल्याला एनसीबीचे समन्स मिळाले नाहीत असं रकुलने माध्यमांना सांगितलं होतं. मात्र, एनसीबीने यावर भाष्य करत रकुलला समन्स मिळाल्याचं स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 9:02 am

Web Title: narcotics control bureau ncb raid mumbai drugs case bmh 90
Next Stories
1 रकुल प्रीत सिंहची आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी
2 ‘ब्रिमस्टोवॅड’ पाण्यात
3 ६० वर्षांपूर्वी हटवलेले कारंजे पुन्हा मेट्रो चौकात
Just Now!
X