News Flash

अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचेही नाव

बॉलिवूड ड्रग्जप्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात धाड टाकली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. एनसीबीने बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची चौकशीसुद्धा केली आहे.

ड्रग्जप्रकरणी अर्जुन रामपालच्या नावाची होती चर्चा

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींच्या चौकशीनंतर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये A, D, R आणि S ही अक्षरं समोर आली होती. त्यानुसार, A म्हणजे अर्जुन रामपालच्या नावाची चर्चा होती.

अर्जुनच्या मेहुण्याचेही नाव

याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जप्रकरणी त्याचं नाव समोर आल्याने अ‍अँगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी धाड

एनसीबीच्या छाप्यांदरम्यान बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. फिरोज यांच्या घरी एनसीबीने केलेल्या कारवाईअंतर्गत १० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने मुंबईत पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 2:48 pm

Web Title: narcotics control bureau raids arjun rampal premises in andheri bandra and khar ssv 92
Next Stories
1 मुंबईकरांना फटाके फोडण्यासाठी एकच दिवस; महापालिकेकडून फटाके बंदी
2 मुलाला घरातून पळवण्यासाठी आईने पोलिसांवर फेकली मिरची पूड
3 मेट्रो प्रकल्पात मिठाचा खडा टाकू नका : मुख्यमंत्री
Just Now!
X