News Flash

देशाचा पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच असेल- अशोक चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती ३१ ऑगस्टपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढणार आहे. अशोक चव्हाण हेच या जनसंघर्ष यात्रेचे नेतृत्त्व करतील अशीही माहिती मिळते आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून केलेले त्यांचे हे भाषण शेवटचे असणार आहे, कारण पुढचा पंतप्रधान आमचाच म्हणजेच काँग्रेसचाच असणार आहे असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. मुंबई काँग्रेच्या टिळक भवन कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर झालेल्या भाषणात अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे बोलले पाहिजे, देशात १५ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यावर मोदी मूग गिळून गप्प आहेत. मीरा भाईंदरमध्ये बॉम्ब मिळूनही कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही? सनातन संस्थेवर बंदी का आणली जात नाही? कोर्टातले खटले व्यवस्थित का चालत नाहीत? असेही प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केले. जनता यावेळी नक्कीच आम्हाला कौल देईल त्यामुळे लाल किल्ल्यावरचे मोदींचे हे शेवटचे भाषण असेल. पुढचा पंतप्रधान काँग्रेसचा असेल असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले.

BLOG: ‘प्रधानसेवक’ मोदींचे लाल किल्ल्यावरील हे शेवटचे भाषण ?

एवढेच नाही तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती ३१ ऑगस्टपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढणार आहे. अशोक चव्हाण हेच या जनसंघर्ष यात्रेचे नेतृत्त्व करतील अशीही माहिती मिळते आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून ही संघर्षयात्रा काढली जाणार आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 4:11 pm

Web Title: narendra modi will not be next pm congress will win says ashok chavan
Next Stories
1 ध्वजारोहणावेळी बडतर्फ महिला पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न
2 दीड वर्षांपासून सुटी न मिळाल्याने ट्रॅकमनची रेल्वेखाली आत्महत्या, संतप्त कर्मचाऱ्यांचा रेल रोको
3 पैशांच्या कारणावरून जामखेडमध्ये एसटी वाहकावर गोळीबार
Just Now!
X