News Flash

फेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक

लैंगिक शोषणाविरोधात आता महिला स्वत:हून पुढे येऊन तक्रार करत असून नाशिकमध्ये लैंगिक विकृतीचे असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

लैंगिक शोषणाविरोधात आता महिला स्वत:हून पुढे येऊन तक्रार करत असून नाशिकमध्ये लैंगिक विकृतीचे असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा वापर करुन महाराष्ट्रातील तब्बल ६५८ महिलांना छळणाऱ्या नाशिकमधल्या २६ वर्षाच्या युवकाला नाशिक सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. विश्वजीत जोशी असे आरोपीचे नाव आहे.

विश्वजीत स्वत: नेकेड होऊन फेसबुकवरुन या महिलांना व्हिडिओ कॉल करायचा व चेहरा लपवून ठेवायचा. पुण्यातील २० ते ३५ वयोगटातील जवळपास १५ मुलींना त्याने असा त्रास दिला. पीडित तरुणीने नाशिक सायबर गुन्हेशाखेकडे तक्रार दाखल करताच विश्वजीत जोशीला २४ तासांच्या आत मंगळवारी अटक करण्यात आली.

२६ वर्षीय तक्रारदार तरुणीला मागच्या आठवडयात जोशीने फेसबुक मेसेंजरवरुन व्हिडिओ कॉल केला. समोरचे दृश्य पाहून या तरुणीला धक्काच बसला. समोर विवस्त्र अवस्थेत असलेला अज्ञात तरुण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार १५ मे पासूनच तिला सोनल शितोळे नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन अश्लील मेसेज आणि फोटो येत होते. जेव्हा तिने अकाऊंट ब्लॉक केले तेव्हा दोन दिवसांसाठी तिचा त्रास थांबला पण त्यानंतर पुन्हा सोनल जामल या अकाऊंटवरुन तिला अश्लील फोटो आणि मेसेज येण्यास सुरुवात झाली.

विश्वजीत जोशी नेकेड अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्यानंतर आपला चेहरा लपवून ठेवायचा. फेसबुकवरुन अशा प्रकारचा छळ सुरु झाल्यानंतर भेदरलेल्या त्या तरुणीने सायबर गुन्हेशाखेत तक्रार नोंदवली. पोलीस तपासात विश्वजीतने वेगवेगळया महिलांच्या नावाने २० बनावट अकाऊंट उघडली असल्याचे समजले. सावज हेरल्यानंतर विश्वजीत आधी सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलायचा पण नंतर अचानक तो अश्लील चॅटिंग सुरु करायचा.

विश्वजीतचे वडिल सेवानिवृत्त झाले असून त्याचा मोठा भाऊ इंजिनियर तर आई गृहिणी आहे. त्याने कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप, एक मोबाइल फोन आणि सीम कार्ड जप्त केले आहे. विश्वजीतने २० बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महाराष्ट्रातील जवळपास ६५८ महिलांचा अशा प्रकारे छळ केला. पोलिसांनी विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:48 pm

Web Title: nashik youth arrested for nude calling to women from facebook
टॅग : Facebook,Nashik
Next Stories
1 २,१०० पेक्षा जास्त कंपन्यांनी चुकवली बँकांची ८३ हजार कोटींची देणी
2 मागील सात महिन्यात ३९ लाख लोकांना नोकरी
3 दहा वर्षांच्या मुलीवर काकासह तिघांचा वर्षभर सामूहिक बलात्कार
Just Now!
X