News Flash

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार

या दोघांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे

महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांची निवड राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी झाली आहे. देशभरातून १० मुली आणि १२ मुलं अशा एकूण २२ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे.

आकाश खिल्लारेची कौतुकास्पद कामगिरी

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या आकाश खिल्लारेने एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला. आकाश शाळेत जात असताना त्याला बुडणाऱ्या माय लेकी दिसल्या. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या दोघींना वाचवलं. नदीवर कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगी गेल्या होत्या. त्यावेळी तिची मुलगी पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघीही बुडू लागल्या. त्याचवेळी तिथून आकाश चालला होता. आकाशने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि या दोघींचा जीव वाचवला.

झेनचं शौर्य
मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली. त्यावेळी सहावीत शिकणाऱ्या झेन सदावर्तेने जागरुकपणे १३ जणांचे प्राण वाचवले. शाळेत शिकलेल्या धड्यातील माहितीचा वापर तिने या प्रसंगातून सुटका होण्यासाठी केला. आग लागल्याने धुराचे लोट पसरतात. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. अशावेळी एखाद्याचा मृत्यू गुदमरुन होण्याची शक्यता असते. मात्र अशा व्यक्तीच्या तोंडावर ओले कापड ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. याच धड्यातील माहितीचा वापर करुन झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले.

आता याच दोघांचा गौरव वीरता पुरस्काराने केला जाणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 3:55 pm

Web Title: national bravery award to two children from maharashtra scj 81
Next Stories
1 साईबाबांचा जन्म पाथरीतच, ग्रामस्थांचा ठराव; उद्य़ा मुख्यमंत्र्यांना भेटणार
2 मनसेने व्हिडीओ ट्विट करत दिले बदलाचे संकेत, दाखवली ‘हिंदवी स्वराज्या’ची झलक
3 पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींच्या त्या व्हिडीओवर संभाजी राजेंची संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X