News Flash

प्रदीप शर्मांच्या कार्यालयावर NIA कडून छापेमारी!

अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.(संग्रहीत छायाचित्र)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केलेली आहे. स्फोटके पेरणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणांत शर्मा यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्याचा दावा ‘एनआयए’ने न्यायालयात केला आहे. तर, NIA नं १७ जून रोजी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा देखील टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा एनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

एनआयए कडून आज(बुधवार) करण्यात आलेल्या छापेमारी संदर्भात एएनआयने ट्विट केलं आहे. शिवसेना नेते व मुंबई पोलीस दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाउंडेशन या एनजीओवर एनआयएच्य पथकाकडून छापेमारी सुरू आहे. असं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत. तर, ’मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट करण्यात वाझेंबरोबर शर्माही सहभागी होते, असे ‘एनआयए’च्या वकिलाने न्यायालयात सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 9:38 pm

Web Title: national investigation agency raid at pradeep sharma ngo ps foundation msr 87
Next Stories
1 पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी, रहिवाशांना २ वर्षांत मिळणार घरं!
2 महाराष्ट्रात Delta Plus Variant चं प्रमाण फक्त ०.००५ टक्के, पण त्याचे गुणधर्म गंभीर – आरोग्यमंत्री राजेश टोपे
3 “फक्त सत्तेच्या गुळाचा चिकटलेले मुंगळे, अशी महाराष्ट्रात अवस्था!” देवेंद्र फडणवीसांची परखड टीका!
Just Now!
X