अन्य पुरस्कारांची नामांकने जाहीर; १४ जून रोजी पुरस्कार वितरण
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या यंदाच्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’साठी ज्येष्ठ अभिनेते चंदू डेग्वेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या अन्य पुरस्कारांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरील विविध पुरस्कारांसाठी यंदा पहिल्यांदाच ही पद्धत अवलंबिण्यात आली आहे. १४ जून रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्याचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते १४ जून रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ‘संगीत नाटकांचे लेणे-नांदी’ हा कार्यक्रम तर पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. रात्री साडेआठ वाजता राज्य नाटय़ संगीत स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे नाटक ‘संगीत शारदा’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

Untitled-15